Jalgaon ACB Trap: निंभोरा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात विमल गुटखा जप्ती प्रकरणातील वाहन सोडण्यासाठी मागितली १० हजारांची लाच

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर   (मुबारक तडवी ) : 
            रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस स्थानकात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांना जळगांव एसीबीच्या पथकाने निंभोरा पोलिस स्टेशन ला जप्त असलेल्या चारचाकी वाहन सोडण्याचे बदलात तक्रारदाराकडुन १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.[ads id="ads1"] 
  सदर घटनेने निंभोरा पोलिस स्टेशन (Nimbhora Police Station) सह पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. सदर कारवाई १२ जून रोजी दुपारच्या ३ वाजेच्या सुमारास झालेली असून लाचखोर पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांचेवर निंभोरा तालुका रावेर पोलिस ठाण्यात(Nimbhora Police Station) गुन्हा दाखल करण्यात आहे.[ads id="ads2"] 
  सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, निरीक्षक अमोल वालझाडे, निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर , पोना. किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे, पोकॉ. प्रदीप पोळ, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी केली आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांना लाच घेताना पकडल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!