रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दि 8/6/24 रोजी विवरे येथील श्री ग गो बेंडाळे हायस्कूल च्या प्रांगणात सन 1995 च्या दहावीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन कार्यक्रम उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमास तत्कालीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उस्फुर्त सहभाग घेऊन त्यावेळेस त्यांच्या शैक्षणिक जीवनात घडलेल्या .स्मूर्तींना उजाळा देत या प्रसंगी अँड सूर्यकांत देशमुख, योगेश राणे, शैलेश महाजन,अँड चैताली चौधरी, चेतना पाटील, किरण सोनवणे, सरला पाटील यांनी आपल्या मनोगतातून अनेक आठवणीना उजागर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एस डी नेमाडे सर हे होते त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की गरजेच्या वेळी जो मित्र मदत करतो तो खरा मित्र तसेच सर्व संपत्ती या नश्वर आहेत खरी संपत्ती मित्रता हीच आहे या कार्यक्रमाला,आर जी भंगाळे,व्ही बी भिरूड,एल जे तळेले,आर एल बैरागी,ए के खाचणे,ए जी महाजन,एन् आर तडवी,एस व्ही येवले,कोल्हे सर ,पी एच वायकोळे मुख्याध्यापक,हे हजर होते तर शिक्षकेतर कर्मचारी डी एम राणे,पी पी मिसर,यु एम् राणे,एस् एम् गायकवाड हे उपस्थित होते याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला आठवण म्हणून रेफ्रिजरेटर भेट देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा नेमाडे मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन शिवाजी मानकरे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंकज बोंडे, ॲड सुर्यकांत देशमुख,शैलेश महाजन,शामराव महाजन, विजय आसटकर, खिलचंद राणे, मोहन महाजन, जीवन पाटील, शैलेश शिंपी, हरीश पाटील,मुकेश चौधरी यांनी परिश्रम घेतले