यावल ( सुरेश पाटील )
आज शुक्रवार दि.२१ जून २०२४ रोजी यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. [ads id="ads1"]
इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी चे एकूण ४८५ विद्यार्थी व १३ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कृतियुक्त मार्गदर्शन प्रशांत महाजन सर,पंढरीनाथ महाले सर,सौ.सविता वारके मॅडम यांनी केले.सदर प्रंसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर यांनी विद्यार्थ्यांना निरोगी व सुदृढ आरोग्यासाठी दैनंदिन जीवनात नियमित योग करणे बाबतचे महत्व सांगितले व आजपासून नियमित योग करण्याचे आवाहन केले.[ads id="ads2"]
तसेच आपल्या आईवडील यांना पण योगा करण्याचा आग्रह करावा असे सांगितले.कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.आसन व्यवस्था सुनील श्रावगी व प्रकाश जयकारे तर फलकलेखन पुरुषोत्तम साठे सर व संजय चौधरी सर यांनी केले.



.jpg)