सावदा परिसर पत्रकार संघ अध्यक्षपदी दिपक श्रावगे सचिव शेख फरीद कार्याध्यक्ष पदी मुबारक तडवी यांची निवड

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


सावदा प्रतिनिधी - मुबारक तडवी 

 सावदा परिसर पत्रकार संघाची बैठक आज दि १४ जून रोजी १२ वाजता कृषी उत्पन्न उप बाजार समिती सावदा सभागृहात संपन्न झाली   बैठकीत सावदा परिसर पत्रकार संघाची सर्वानुमते कार्यकारीणी जाहीर करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संस्था चे संस्थापक अध्यक्ष तथा दैनिक लोकशाही व जळगांव वृत्त चे विभागीय उपसंपादक फारुख शेख हे होते.[ads id="ads1"] 

  दरम्यान सावदा परिसर पत्रकार संघाचे अध्यक्षपदी दिपक श्रावगे, उपाध्यक्षपदी दिलीप चांदेलकर , कार्याध्यक्षपदी मुबारक अलीखाँ तडवी, सचिव शेख फरीद शेख नुरा, सह कार्याध्यक्ष रविंद्र हिवरकर, सह सचिव राजेश बाबुराव पाटील, संघटक युसूफ शाह, प्रसिद्धी प्रमुख राजेश बाबुराव  चौधरी व  प्रदीप शरद कुलकर्णी आदींची कार्यकारीणीत निवड करण्यात आली.[ads id="ads2"] 

  पत्रकारिता करीत असतांना संघटनेची आवश्यकता उपयोग तसेच धारदार लेखणी द्वारे जनसामान्यांच्या अडी अडचणी कशा पद्धतीने सोडवता येतील यासाठी पत्रकारितेची बोथट लेखणीची लिखाणाची तीक्ष्ण धार कशी करता येईल, पत्रकारांची समस्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील कसे राहता येईल. आदी विविध विषयांवर चर्चा विचार विनिमय करण्यात आले. बैठक झाल्यानंतर अध्यक्ष व कार्यकारणीचे स्वागत करण्यात आले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!