मदत व पुनर्वसन मंत्री ना. अनिल पाटील यांच्याकडून थोरपाणी येथील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना शासनाकडून भरीव मदत देण्याच्या सूचना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील )

यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील यांची अमळनेर येथे भेट घेत यावल तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीत नुकसान ग्रस्त पीडित कुटुंबांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी म्हणून मागणी केली असता नामदार अनिल पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याबाबत सूचना दिल्या.[ads id="ads1"]  

   दि.२४ मे २०२४ रोजी यावल तालुक्यातील आंबापाणी  येथील थोरपाणी आदिवासी पाड्यावर वादळामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचे निधन होते त्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे या कुटुंबाला तात्काळ मदत मिळावी म्हणून  यावल येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी यांनी  मागणी केली.त्या मागणीला  प्रतिसाद देत तत्काळ यावल तहसीलदार मॅडम व  जिल्हाधिकारी जळगांव व मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तात्काळ सूचना देऊन लवकरात लवकर त्या कुटुंबांना मदत मिळवून देण्याचे आदेश नामदार मंत्री महोदयांनी काल दिले,त्यात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन च्या माध्यमातून प्रत्येकी ४ लाख रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधी मधून प्रत्येकी १ लाख अशी २० लाख  रुपयांची मदत ही त्या पिडित कुटुंबियांच्या वारसांना देण्या संबंधीत विभागांना सूचना देण्यात आल्या.[ads id="ads2 "]  

  २४ मे रोजी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामध्ये यावल तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगेस लागून असलेल्या मौजे आंबापाणी या अतिदुर्गम भागातील गावाजवळील थोरपाणी आदिवासी पाड्यावर घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाच आदिवासी पावरा कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दु:खद घटना घडली होती.या घटनेनंतर सर्व स्तरातून राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले होते,त्यात यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा अंमळनेर येथे जाऊन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांची भेट घेऊन पीडीत कुटुंबाला लवकरात लवकर मदत देण्यासाठी विनंती केली. याप्रसंगी यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ॲड.देवकांत बाजीराव पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,राष्ट्रवादी सामाजिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सपकाळे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राकेश पाटील, कोरपावलीचे सरपंच तथा सामाजिक आघाडी तालुका अध्यक्ष विलास अडकमोल, चुंचाळे येथील छत्रपती फाऊंडेशनचे संचालक विनोद पाटील वरडसीम येथील ग्रा.प.सदस्य विलास पाटील, राष्ट्रवादी भुसावळ माजी युवक अध्यक्ष अतुल चव्हाण इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!