"सावदा विज वितरणकडे नविन विज डिपी शिल्लक असते तर लवकर सदरील समस्या मार्गी लागली असती.तरी कधीही व कोणतीही विज डिपी अशा प्रकारे जाळू शकते,खराब होवू शकते.तरी या अनुषंगाने आणि आपल्या विज ग्राहिकांना जास्त वेळ अशा प्रकारे त्रास सहन करावा लागू नये म्हणून सावदा विज वितरणचे संबंधित अधिकाऱ्यांनी याची जाणीव ठेवून या २० हजार लोकसंख्याचे सावदा शहरासाठी नविन विज डिप्या यापुढे शिल्लक ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.तसेच शहर विज वितरणकडे विज डिपी शिल्लक नसल्याची व सदरील डिपीमध्ये बिघाड का झाले.?ही माहिती शहर कक्ष अभियंता हेमंत चौधरी यांनी स्थानिक वार्ताहरांनी विचारले असता दिली आहे."[ads id="ads1"]
-------------------------
सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदा :- येथील मदिना नगर,गौसिया नगर,जिलानी नगर या भागातील घरांची विज दि.३१ मे रोजी रात्री ९-३० वाजेच्या सुमारास अचानक बंद झाली.तरी गेल्या आठवड्या भरापासून या भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याने काही वेळात सदरची विज येईल असे विज ग्राहीकांना वाटले होते.परंतू बराचवेळ उलटला तरी घरांची विज आली नाही.परिणामी या भागातील १२२२ क्रमांक ची विज डिपी जाळल्याची माहिती समोर आली असता नविन विज डिपी बसविण्याचे किंवा दुरुस्तीचे काम रात्री ऐवजी सकाळी दिवासात करण्यात येईल.अशी माहिती संबंधित लाईनमन कडून मिळाली.[ads id="ads2"]
तरी येथील घरांची लाईन बंद असल्यामुळे पंखे,कुलर सारखे यंत्र चालूच शकत नाही.यामुळे मोठ्या प्रमाणात गर्मी व उष्णता जाणवत होती.त्या डांस,मच्छरांचा अतिरेक हे सर्व या परिसरातील रहिवासी विज ग्राहकांच्या घरातील लाहन मुलांना,तरूण व वृद्ध महिला पुरुषांसह आजारी लोकांना संपूर्ण रात्रभर सहन करावा लागला.तसेच आज दि.१ जून रोजी दिवसात सुमारे १२ वाजता याठिकाणी नविन विज डिपी बसविण्याचे कार्य लाईनमन शरीफ तडवी सह कर्मचारी यांनी कामाला सुरुवात केली असता जवळपास दुपारी ४ वाजेपर्यंत या परिसराची लाईन सुरू होईल.तरी सदर भागातील विज ग्राहिकांना दिवसात देखील सदर प्रकारे एकंदरीत सरासरी २० तास हे त्रास सहन करावा लागेल.हे खरे असले तरी अशा उन्हाळ्याचे शेवटी व सुरवाती पावसाळ्याच्या दिवसात भयंकर तापमान व उकाडा होत असून जीवाची लाही लाही होते.अशा दिवसात लोकांना सदर भागातील लोकांना हे त्रास सहन करावा लागल्याने संबंधित विज वितरणाच्या कारभार बाब त्यांच्यात नाराजीचे सूर उमटत आहे.



