यावल ( सुरेश पाटील ) बोगस बियाणे विक्री करणारे व कंपनीवर कारवाईसाठी भरारी पथक नियुक्त करावे अशी शेतकरी हिताची मागणी यावल रावेर आशय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांनी जिल्हा कृषी अधिकारी जळगाव यांच्या कार्यालयातील कॉलिटी इन्स्पेक्टर विकास बोरसे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.[ads id="ads1"]
जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने समाधानकारक हजेरी लावली असून शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या करण्यास सुरुवात केली परंतु बऱ्याच ठिकाणी काही शेतकऱ्यांना बाजारातून बोगस बियाण्यांची विक्री झाली त्यामुळे पेरणी झाल्यानंतर रोप न उगवल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहे.याबाबत कंपन्यांवर आणि विक्रेत्यांवर कारवाई होत नाही. [ads id="ads2"]
यात शेतकरी आर्थिकरित्या भरडला जातोय.तरी काही बोगस बियाणे विक्रेत्यांवर आणि संबंधित कंपनीवर कारवाई करावी करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथक नियुक्त करून बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी डॉक्टर कुंदन फेगडे व त्यांच्या सोबत डॉक्टर सुनील पाटील उदयभान पाटील सहकारी पदाधिकाऱ्यांनी केली.