समलैंगिक बहिणीने नात्याला काळीमा फासला; मध्यरात्री वहिनीसोबत......

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ज्या आईने जन्म दिला तिलाच गळा दाबून मारून टाकलं. ज्या भावाच्या हातावर राखी बांधली तिने त्याच भावाला कायमचा संपवला. तिचे हात आईचे जीव घेताना थरथरले नाहीत. जिच्यासोबत रिल्स बनवून ती सोशल मीडियात मित्रमैत्रिणींना शेअर करत होती.

हरियाणाच्या यमुना नगर (Yamuna Nagar, Haryana) भागात दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला आहे. एकुलत्या एक मुलीनं इतकं मोठं षडयंत्र रचलं यावर लोकांना विश्वास बसत नाही. या घटनेला ७२ तास उलटल्यानंतर आरोपी काजलबाबत तिच्या मावशीनं हैराण करणारा खुलासा केला आहे.[ads id="ads1"] 

पोलीस चौकशीत हत्येच्या दिवशी म्हणजे २३ जूनला एक रहस्य बाहेर पडल्याचा खुलासा झाला होता. २७ वर्षीय काजल एक समलैंगिक मुलगी होती. तिला लहानपणापासून मुलांसारखं राहण्याचा छंद होता. काजलच्या भावाचे २ लग्न झाले होते. राहुलचं पहिलं लग्न काजलनेच तिच्या एका मैत्रिणीसोबत केले होते. लग्नानंतर काजल तिच्या मैत्रिणीला रात्री तिच्या खोलीत बोलावत होती. ही बाब उघड होताच राहुल आणि त्याच्या पत्नीत वाद झाला. त्यानंतर राहुल आणि त्याची पत्नी वेगळे झाले.

पत्नीला मुले होत नाही म्हणून दोघे वेगळे झाल्याचं लोकांना सांगितले. काही काळानंतर राहुलने दुसरं लग्न केले. घरात नवीन सून आली तिचे काजलसोबत सतत वाद होत होते. त्यामुळे काही दिवसांनी ती माहेरी निघून गेली. या सर्व गोष्टीवरून काजलचं तिच्या आईशी आणि भावाशी वाद व्हायचे. परंतु तिच्या मनात इतका राग असेल ज्यातून ती इतकं मोठं षडयंत्र आणि गंभीर पाऊल उचलेल याची भनकही कुणाला नव्हती.[ads id="ads2"] 

हत्येनंतर ब्यूटी पार्लरला गेली काजल

काजलला आई आणि भावाला मारल्याचा कुठलाही पश्चाताप नाही. हत्याकांडानंतर काजल घरात ठेवलेले १४ लाख रुपयांचे दागिने स्कूटीत घालून बाहेर पडली. ती परिसरात फिरत होती. त्यानंतर ब्यूटी पार्लरलाही गेली. जेव्हा पोलीस घरी पोहचले, तेव्हा लुटीमुळे ही घटना घडल्याची चर्चा झाली तेव्हा ती परत आली. ज्यूस घ्यायला बाहेर गेलेली असं तिने पोलिसांना सांगितले.

VIP नवाब नावानं Instagram वर Account

एका मोबाईल शॉपवर (Mobile Shop)  सेल्सगर्ल म्हणून काम करणाऱ्या काजलचे नेहमी आईसोबत वाद व्हायचे. काही महिन्यापूर्वी काजल घर सोडून गेली होती. आईने समजवल्यानंतर ती माघारी आली. काजल व्हिआयपी नवाब नावाने Instagram अकाऊंट चालवायची, त्यावर रिल्स बनवून शेअर करायची.

दरम्यान, काजलसोबत मिळून संपत्तीच्या लालसेपोटी आत्या आणि भावाच्या हत्याकांडात सहभागी कृष हादेखील शातिर होता. त्याच्यावर कुणालाही संशय येऊ नये यासाठी हत्येनंतर तो ऋषिकेशला गेला. त्याआधी त्याने काजलच्या भावाची हत्या ज्या रॉडनं केली तो एका पार्कमध्ये फेकला. त्यानंतर रक्ताचे डाग लागलेले कपडे नाल्यात फेकले. मात्र काजलचा भांडाफोड झाल्यानंतर कृषही पोलिसांच्या तावडीत सापडला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!