आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आणि इंग्लिश मीडियम स्कूलचा समन्वय नसल्याचा परिणाम
यावल ( सुरेश पाटील ) तालुक्यातील डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इयत्ता पहिली पासून प्रवेश घेतलेल्या मुलांना इयत्ता दहावीत प्रवेश देण्यासाठी संस्थाचालकांनी नकार दिल्याने दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी आज यावल येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात येऊन आपली कैफियत मांडली. [ads id="ads1"]
या प्रकरणात प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की संस्था चालकांना आदिवासी विभागाकडून थकीत बिल न मिळाल्याने संस्थाचालकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास नकार दिल्याचे बोलले जात असले तरी दुसरीकडे इयत्ता पहिली पासून ज्या शाळेत आदिवासी मुलांनी शिक्षण घेत आहे त्या शाळेत विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावी मध्ये प्रवेश मिळत नसल्याने यात आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी तसेच संस्था चालकांचा समन्वय नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असून त्यांना प्रवेश मिळत नसल्याचे त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.[ads id="ads2"]
आदिवासी विद्यार्थ्यांना डोणगाव येथील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश का दिला जात नाही, संस्थाचालकांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी यांच्याकडे विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याबाबत लेखी पत्र दिले ते लेखी पत्र संस्था चालकांनी कोणत्या नियमानुसार दिले..? आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेताना विद्यालयाचे तसेच संस्था चालकांनी घालून दिलेल्या अटी शर्ती नियमांचे पालन करीत नाही का..? आदिवासी विद्यार्थ्यांनी विद्यालयात शिक्षण घेताना किंवा निवासी असताना काही चुकीची वागणूक देऊन संस्था चालकांच्या शैक्षणिक कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला आहे का..? इत्यादी अनेक विषयांबाबत आदिवासी संघटनांनी डोणगाव येथील शिक्षण संस्था आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी समन्वय साधून आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये प्रवेश कसा मिळेल याबाबत समन्वय साधला पाहिजे असे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात बोलले जात आहे. याबाबत प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक नो रिप्लाय झाला असून त्यांची कार्यालयीन वेळेत कार्यालयात भेट न झाल्याने ते शासकीय कामानिमित्त बाहेर गेली की कार्यालयात उशिराने येणार आहेत..? याबाबत सुद्धा माहिती मिळाली नाही.



