यावल ( सुरेश पाटील ) आयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे भरारी पथक दिनांक 11 जून रोजी भुसावल विभागात आले असले तरी नेमकी कारवाई कोणत्या बियरबार परमिट रूमवर किंवा देशी विदेशी दारू विक्रेत्यांवर कारवाई केली हे मात्र गुलदस्त्यात असल्याचे देशी विदेशी दारू विक्रेत्यांसह परमिटरूम बार चालकांमध्ये बोलले जात आहे.[ads id="ads1"]
मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे परिपत्रक क्र.११२०२२ / निरीक्षण / १६९ / सात मुंबई, दि. २१ मे २०१४ संदर्भांनुसार राज्य उत्पादन शुल्क भुसावळ दुय्यम निरीक्षक यांनी भुसावळ विभागातील सर्व परवानाधारकांना दि.२५ मे २०२४ रोजी लेखी पत्र देऊन महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या आणि आहेत,त्यानुसार विभागात विशेष करून सावदा,फैजपुर भुसावळ परिसरात सर्वांना परिचित असलेले काही ठराविक देशी विदेशी दुकानदार आपले दुकाने केव्हा उघडतात..? [ads id="ads2"]
आणि दुकाने केव्हा बंद करतात,देशी विदेशी मालाचा स्टॉक कुठून कुठे कोणत्या नियमानुसार कोणत्या वेळेला आणि कोणत्या वाहनातून वाहतूक करतात..? आणि इतर अटी शर्ती नियमानुसार देशी विदेशी दारू विक्री होत आहे किंवा नाही,मध्य विक्री अनुज्ञप्तीच्या वेळेप्रमाणेच विक्री करीत आहे किंवा नाही याची चौकशी व कारवाई करण्यासाठी नाशिक विभाग स्तरावरील भरारी पथक आज भुसावळ विभागात कारवाई करण्यासाठी आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.परंतु भरारी पथकाने नेमकी कुठे आणि कोणावर काय कारवाई केली हे मात्र समजून न आल्याने झालेली कारवाई गुलदस्त्यात पॅक असल्याचे बोलले जात आहे.


