जळगांव जिल्ह्यातील तीन सपोंनींची बदली : सावदा पोलिस स्टेशनचे जालिंदर पळे यांची बदली कोल्हापूरला

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

         


 सावदा प्रतिनिधी (मुबारक तडवी)   जळगाव जिल्ह्यातील तीन सहाय्य्क पोलीस निरीक्षकांच्या बदल्या महाराष्ट्र राज्यातील विनंती बदलीसह जिल्हा अंतर्गत कार्यकाळात सेवाकाळ पुर्ण करणारे विनंती बदलीसाठी  ४२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल (आस्थापना) यांनी काढले असून यात जळगाव जिल्ह्यातील  सावदा सपोनिसह तीन अधिकार्‍यांची बदली करण्यात आली आहे. [ads id="ads1"] 

  महाराष्ट्र राज्यातील ३०० सहायक पोलीस निरीक्षकांच्या विहित कालावधी पूर्ण झाला असल्यामुळे १२०सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या विनंती वरून बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील जालिंदर पळे, विशाल जयसिंग टकले आणि संदीप दुनगहू या तीन अधिकार्‍यांचा समावेश आहे.[ads id="ads2"] 

सावद्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली. तर विशाल टकले यांची पुणे शहर तर मुक्ताईनगरचे संदीप दुनगहू यांची छत्रपती संभाजी नगर परिमंडळात बदली करण्यात आली.संबधित बदली झालेल्या सपोनि यांनी  पदभार सोडल्यानंतर जळगाव पोलीस अधीक्षकांकडून येथे लवकरच अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे ही समजते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!