यावल ( सुरेश पाटील ) बुधवार दि.१२ जून २०२४ पासून म्हणजे गेल्या १० दिवसात यावल तालुक्यात पावसाचा १ थेंब (१ मि.मी ) सुद्धा न पडल्याची अधिकृत नोंद यावल तहसील तथा महसूल विभागात झाली असल्याने तसेच बाजारातील उलाढाल लक्षात घेता शेतकरी, व्यापारी,मजूर वर्ग हवालदील झाला असून सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त होऊन वरूण राजाचे आगमन केव्हा होईल.? याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.[ads id="ads1"]
यावर्षी यावल तालुक्यात १० व ११ जून २०२४ रोजी वरूण राजाने वेळेवर आगमन करून शेतकऱ्यांना मोठी आनंददायी सुखद सूचना दिली होती या दोन दिवसात ८१.४५ मि.मी.पाऊस पडला आहे, परंतु त्यानंतर म्हणजे आज शनिवार दि.२२ जून २०२४ पर्यंत वरून राजाने हजेरी न लावल्याने तसेच पावसाचा एक थेंब सुद्धा न पडल्याने सर्व स्तरात तीव्र चिंता व्यक्त करण्यासाठी येत आहे. [ads id="ads2"]
मार्केटला केळी व्यापारी वर्गातून केळी खरेदीचे भाव ११०० ते १२०० रुपये प्रति क्विंटल असले तरी शेतकऱ्यां मध्ये पाहिजे त्या प्रमाणात समाधान व्यक्त करण्यात येत नाही.पाऊस लांबत असल्याने मात्र बाजारात चांगल्या प्रतीची हिरवी मिरची ४० रुपये पाव, पालेभाज्या २५ ते ३० रुपये पाव, कांदे ७० ते ८० रुपये किलो आहेत.वरूण राजाचे जोपर्यंत समाधानकारक आगमन होत नाही तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरण्या केल्या आहेत त्यांच्यात दुबार पेरणीची भीती निर्माण झाली आहे अशाच प्रकारे मार्केटमध्ये सर्व वस्तूचे भाव गगनाला भिडणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये,
शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



