रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर तालुका हा केळी प्रधान तालुका असुन रावेर रेल्वे स्टेशन वरती बहुतेक रेल्वे गाडयां थांबत नसल्याने तसेच भुसावळ कटनी पॅसेंजर हे पुर्वी वेळेप्रमाणे सुरळीत व्हावी,तसेच दिल्ली, मुंबई,इतर राज्यात जाणयासाठी व शेती माल विक्रिसाठी व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात जात असुन रावेर रेल्वे स्टेशन वर प्रत्येक गाडी ला थांबा द्यावा.[ads id="ads1"]
जेणे करून येणारे जाणारे विद्यार्थी, मजुर वर्ग,व्यापारी,यांना त्रास होणार नाही अशी मागणी संविधान आर्मी संघटनांचे पदधिकारी यांनी निवेदनद्वारे रेल्वे प्रशासनाकडे केली आहे, यावेळी ऍड. दिपक तायडे,अशोक अटकाळे, संतोष अंबादास ढाकणे, सिद्धार्थ झालटे,चाॅद भाई आदि यांच्यासह आदी पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते