अजित तायडे यांची कक्ष अधिकारी पदारून अवर सचिव या पदावर पदोन्नती....

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मुंबई (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (राजपत्रित) संवर्गातील अधिकारी यांना  अवर सचिव, गट-अ या पदावर सामान्य प्रशासन विभाग द्वारे काढण्यात आलेल्या आदेशान्वये पदोन्नती देण्यात आली आहे.[ads id="ads1"] 

   तसा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०७२३१६४८२६०४०७ असा आहे. मुंबई (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : मंत्रालयीन विभागातील गृह खात्यात कार्यरत असलेले श्री. अजित तायडे, कक्ष अधिकारी,  यांची अवर सचिव, गट-अ या पदावर सामान्य प्रशासन विभाग द्वारे काढण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे  पदोन्नती देण्यात आली आहे.[ads id="ads2"] 

श्री.अजित तायडे यांच्या  निवडीने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, नाशिक विभागीय अध्यक्ष श्री. रवींद्र तायडे तसेच कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जळगाव जिल्हा शाखेचे जिल्हा अध्यक्ष श्री. पुलकेशी केदार, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष बी.एस.पाटील, जिल्हा सरचिटणीस श्री. अनिल गाढे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. योगेश अडकमोल आणि  शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंके, जलसंपदा विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे ,  जलसंपदाचे जिल्हा सरचिटणीस जीभाऊ हटकर, मनपा विभागाचे सुरेश भालेराव, नंदकुमार गायकवाड, वनविभागाचे अध्यक्ष विकास सोनवणे आणि कास्ट्राईब  कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब  कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांचेकडून  श्री. अजित तायडे यांच्या या निवडीने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!