विटवे येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा : ग्रामपंचायततर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) तालुक्यातील विटवे येथे १५ ऑगस्ट हा ७८ वा स्वातंत्र्यदिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांची संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली प्रभातफेरी मध्ये घर घर तिरंगा हर घर तिरंगा अशा घोषणा देण्यात आल्या.[ads id="ads1"] 

   यानंतर ग्रा.पं.कार्यालयासमोर येवून लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी यांनी आपला मान गावातील सामाजिक कार्यकर्ते आयु.गजानन कोळी यांना देऊन श्री.गजानन कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच शालेय व्यवस्थापन समिती तर्फे सांगवे जिल्हा परिषद शाळेत महेंद्र कोळी यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी गृप ग्रा.पं.विटवे/सांगवे यांचे कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  विद्यार्थ्यांना वही,पेन इत्यादी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.[ads id="ads2"] 

  याप्रसंगी सूत्रसंचालन श्री.अवसरमल यांनी केले तर आभार किशोर चव्हाण यांनी मानले.यावेळी उपसरपंच ईश्वर चौधरी,ग्रा.पं.सदस्य साहेबराव वानखेडे,गणेश मनुरे,मधुकर पाटील,विमल भिल्ल,सुरेश कोळी,वैभव चौधरी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आयु.संजय चिंचोले,उपाध्यक्ष शामराव कोळी,पोलीस पाटील बाळु पवार,ग्रामरोजगार सेवक सिताराम वानखेड़े,आशासेविका संगीता वानखेड़े,कोमल कोळी,मंगला पाटील, निर्मला कोळी आंगणवाड़ी सेविका, लक्ष्मी कोळी,मनीषा चौधरी,सुनंदा सोनवणे,कांता महाजन,रतन भिल्ल,सांगवे पोलिस पाटील,वैशाली एकनाथ कोळी,आशा सेविका वैशाली महेंद्र कोळी,भगवान कोळी, सुरेश तायड़े,श्रीराम(खुशाल) कोळी,शाळेचे मुख्यध्यापक श्री.सावळे व त्यांचे सहकारी शिक्षक, ग्रा.प.संगणक परिचालक कैलास मनुरे,नयन जैन,व शाळेतील विद्यार्थी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!