ऐनपूर महाविद्यालयात रासेयो व विद्यार्थी विकास विभागांमार्फत केले वृक्षारोपण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


ऐनपूर ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास व रासेयो स्वयंसेवकांनी वृक्षारोपणांसाठी पुढाकार घेतला. प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.[ads id="ads1"] 

   तसेच राष्ट्रीय सेवा योजना चे विभागीय समन्वयक जे. पी. नेहेते, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एच. एम. बावीस्कर,उपप्राचार्य डॉ. सतीष वैष्णव, रासयो कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. रेखा पाटील तसेच डॉ. पी. आर. महाजन, प्रा. सुनील इंगळे, डॉ. संदीप साळुंके आदींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.[ads id="ads2"] 

   या वृक्षारोपण कार्यक्रमात बकांब, आवळा, शिसम, बदाम ई. वृक्षांची लागवड महाविद्यालय परिसरात करण्यात आली.पर्यावरण संवर्धन साठी वृक्षलागवड करणे आवश्यक आहे.वृक्षतोड करु नका. प्रत्येकाने किमान तीन वृक्षांची जपणूक करा असे प्राचार्य डॉ जे बी अंजने यांनी आपल्या मनोगतात सांगितले.या उपक्रमात रासेयो स्वयंसेवकांचा उत्साह उल्लेखनीय होता. यात सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्रा हेमंत बाविस्कर व रासेयो अधिकारी डॉ दिपक पाटील यांनी मेहनत घेतली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!