आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून निंबोल येथील बस स्थानकाला आमदार निधीतून मंजुरी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

 रावेर प्रतिनिधी - विनोद हरी कोळी

  रावेर तालुक्यातील जुने निंबोल येथील बस स्थानक बऱ्याच वर्षापासून खराब झालेलं होतं. त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या लोकांना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात खूप त्रास सहन करावा लागत होता, याची माहिती जुने निंबोल येथील काही तत्पर समाजसेवक लोकांनी रावेर मुक्ताईनगर मतदारसंघातील कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात आणून दिली.[ads id="ads1"] 

     तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून कामाला जलद मंजुरी दिली. आणि जुने निंबोल येथे त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल निंबोल येथील नागरिकांनी त्यांचे समाधान व्यक्त केले आहे.[ads id="ads2"] 

   कर्तव्यदक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार सुद्धा व्यक्त केले. त्या ठिकाणी उपस्थित नारायण कोळी, भगवान कोळी, सुपडू मोरे, ज्ञानेश्वर गवळे, साहेबराव सोनार, सुनील इंगळे, तसेच त्या ठिकाणी भरपूर संख्येने नागरिक उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!