ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपुर येथील १५ ऑगस्ट रोजी तहकूब झालेली ग्रामपंचायत ची ग्रामसभा दिनांक ३१/०८/२०२४ रोजी सरपंच अमोल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यात कोरम पुर्ण होऊन मागील सभेचे प्रोसिडींग वाचून कायम करण्यात आले त्यानंतर शासकीय परिपत्रक ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी यांनी वाचून दाखविले यात महात्मा गांधी तंटामुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला.[ads id="ads1"]
यावर चर्चा करुन महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष पदी काशिनाथ शामू पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली त्यांचे ग्रामपंचायत कडून शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक विकास कामांवर चर्चा करण्यात आली.[ads id="ads2"]
आयत्या वेळेवरील विषयांवर ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले या विषयावर लवकरात लवकर उपाय योजना करण्यात येणार असे आश्वासन ग्रामसभा अध्यक्ष अमोल महाजन यांनी दिले या ग्रामसभेला ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले व राष्ट्रगीत होऊन ग्रामसभेची सांगता करण्यात आली



