पॉवरग्रिडच्या टॉवरवर तब्बल 50 ते 100 फूट उंच चढून परप्रांतीय तरुणाची आत्महत्या : रावेर तालुक्यातील घटना

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

        


रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) 

रावेर तालुक्यातील विवरे खुर्द ( Vivare Khurd)  खिर्डी रस्त्यावरील विवरे शेत शिवारात एका शेतातील पॉवरग्रिड च्या (Power Grid) टॉवरवर चढून एका २५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना विवरे खु (Vivare  Khurd) गावाजवळ घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी निंभोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. [ads id="ads1"] 
सविस्तर असे की, रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील  खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातून गेलेल्या पॉवर ग्रिटच्या अतिउच्च विद्युत क्षमतेच्या टॉवरवर सुमारे शंभर ते सव्वाशे फुटवर चढून ब्रिजेश कुमार बायगा (वय २५, रा. भरतपूर, छतीसगढ) याने कापडाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली.[ads id="ads2"] 
   त्यामुळे याठिकाणी विवरेसह खिर्डी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी सकाळपासून एकच गर्दी केली. ब्रिजेशकुमार याची पँट व टोपी त्याठिकाणी आढळून आली. त्याच्या पॅटमध्ये पॅनकार्ड आढळून आल्याने त्यावरून पोलीस प्रशासनाने त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला. त्यावरून त्याची ओळख पटली. अंदाजे सुमारे शंभर ते दीडशे फुट उंच टॉवरवर चढून आत्महत्या केल्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा विषय घटनास्थळी चर्चेत होता.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!