माजी नगरसेवक एस.टी.गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या हस्ते फळ वाटप

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील )

यावल नगरपरिषदेचे माजी नगरसेवक तथा सामाजिक पदाधिकारी,आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष,शांतता कमिटीचे सदस्य बुद्धवासी सुपडू खंडू उर्फ एस.टी.गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या समाधी स्थळावर माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून  ग्रामीण रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.[ads id="ads1"] 

  यावेळी यावल शहरातील सर्व स्तरातील पदाधिकारी कार्यकर्ते दलित चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads2"] 

        माजी नगरसेवक एस.टी. गजरे यांच्या पुण्यस्मरणार्थ यावल येथील राजीव गांधी फाउंडेशन अध्यक्ष तथा माजी नगरसेवक,जळगाव जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस विजयकुमार एस.गजरे यांनी व सिद्धार्थ तरुण मंडळ व पंचशील तरुण मंडळ तसेच मित्र परिवारातर्फे यावल येथे संयुक्तिक कार्यक्रम घेण्यात आला.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!