शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प कार्यक्षेत्रातील पिकांचे,बांधकामाचे नुकसान झाल्यास प्रकल्प विभाग जबाबदार राहणार नाही : एस.आर.भोसले

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल ( सुरेश पाटील ) जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पामध्ये ऑक्टोबर २०२४ पासून पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेळगाव प्रकल्प कार्यक्षेत्रातील संपादित केलेल्या जमिनीवरील पिकाचे अथवा बांधकामाचे नुकसान झाल्यास त्यास जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ हे जबाबदार राहणार नाही अशी महत्त्वाची सूचना कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी दिली आहे.[ads id="ads1"] 

           त्यांनी दिलेली माहिती अशी की तापी नदीवरील मौजे शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प ता.जि.जळगाव प्रकल्पात ऑक्टोबर २०२४ पासुन पुर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे.[ads id="ads2"] 

  शेळगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी यावल ( बोरावल बु. टाकरखेडा, वाघळुद, भोरटेक, अंजाळे, पिळोदा, पाडळसे, कठोरे प्र. सावदा ) भुसावळ (जोगलखेडा, भानखेडे, साकेगाव, सतारे) व जळगाव ( शेळगाव, तिघ्रे, कडगाव  ) तालुक्यातील एकुण १५गावांच्या जमिनी संपादीत करण्यात आलेल्या आहेत.तरी याद्वारे संबंधीतांना सुचित करण्यात येते की, संपादीत करण्यात आलेल्या जमिनीवर पिक पेरणी अथवाअतिक्रमण करु नये.तसेच ठिबक सिंचन संच,विद्युत मोटारी,तात्पुरते निवारे / गोठे इ. काढुन घेण्यात यावे.शेळगाव प्रकल्पात पाणीसाठा केल्यानंतर संपादीत जमिनीवरील पिकाचे अथवा बांधकामाचे नुकसान झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता एस आर भोसले यांनी कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!