शेतकरी भूमिपुत्र, नागरिकांच्या कल्याणासाठी शेळगाव बॅरेजचे प्रथमच जलपूजन - डॉ.कुंदन फेगडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



यावल  ( सुरेश पाटील )

आज बुधवार दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव, भुसावळ, यावल, चोपडा, तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या शेळगाव बॅरेजचे शेतकऱ्यांसह जलपूजन केले.

या बॅरेज मध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला. या कल्याणकारी,अमृतमय जलसाठ्याचे सर्वात प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने पूजन रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी,

पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत लोकप्रिय समाजसेवक डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांनी केले.[ads id="ads1"] 

यावल, रावेर, चोपड्यास फायदा

शेळगाव बॅरेज सिंचन योजनेंतर्गत यावल व चोपडा तालुक्यातील  साकळी,नावरे,विरावली, मेहेलखेडी, कोरपावली,दहिगाव, वाघोदा,चुंचाळे, गिरडगाव,वढोदे, दगडी, बोराडे, शिरसाठ यातील ४ हजार ६९९.१३ हेक्टर जमीन तसेच रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल,सांगवी बु.,चितोड, अट्रावल,सातोद,कोळवद या ६ गावांमधील ४ हजार ४२८.९ हेक्टर जमीन,अशी एकूण ९ हजार १२८ हेक्टर जमीन लाभान्वित होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या २०१८-१९ बेंचमार्किंग रिपोर्टनुसार शेतकर्‍यांना सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचा लाभ होणार आहे.या प्रकल्पामुळे पाणलोटांची भूजल पातळीत वाढ होणे व यावल रावेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे,मोठ्या प्रमाणावर भूजल पुनर्भरण,भूजल व्यवस्थापन केल्यास भूजल पातळीत वाढ होणार आहे. या प्रकल्पासाठी माजी खासदार तथा आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांच्यासह,मा.आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे,सौ.लताताई सोनवणे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला आहे. [ads id="ads2"] 

  रावेर विधानसभा मतदारसंघातील  ६ गावे हे सिंचन व औद्योगिक वापरसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याने शेतकरी भूमिपुत्र व नागरिकांच्या सर्वतोपरी कल्याणासाठी,कायापालटासाठी, जलदेवतेची कृपा राहणेसाठी रावेर विधानसभा मतदारसंघातील आणि यावल येथील समाजसेवक तसा डॉ.कुंदन फेगडे यांनी प्रथमच शेळगाव बॅरेज प्रकल्पातील जलपूजन शास्त्रोक्त पद्धतीने केले.

मोठी उपस्थिती

यावेळी गोपाळसिंग पाटील, उखडू पाटील, हेमराज फेगडे,योगेश चौधरी, सौं.अनुराधाताई परदेशी, रोहिदास सपकाळे,गोपाळ कोळी, अनिल सपकाळे,मोहन सपकाळे, सतिष कोळी,गजानन कोळी, संजय पाटील,नाना कोळी,पुष्पक कोळी,गणेश कोळी,अजय कोळी, रितेश बारी,निलेश सपकाळे, अक्षय पवार,राहुल झांबरे,उज्वल कानडे, कोमल इंगळे,शुभम देशमुख,मनोज बारी सह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक,नागरिक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!