यावल येथे सकल धनगर जमातीचे भव्य रस्ता रोको आंदोलन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल  ( सुरेश पाटील )

धनगर जमातीला अनुसूचित लजमाती ( ST ) चे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासन निर्णय काढण्याच्या अनुषंगाने यावल येथे आज सोमवार दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता भुसावळ  टी पॉईंटवर भव्य असे रास्ता रोको आंदोलन शांततेच्या मार्गाने पोलीस बंदोबस्तात करण्यात आले.[ads id="ads1"] 

रास्ता रोको आंदोलन करीत यावल तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात आंदोलक समाज बांधवांनी म्हटले आहे की,धनगर जमात महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या मेंढपाळ आणि पशुपालक म्हणून कार्यरत आहे.१९५६ साली अनुसूचित जमातीच्या ( SC / ST ) यादीत 'धनगड' नावाची जमात दाखल करण्यात आली, ज्यामुळे धनगर जमात गेल्या ६८ वर्षांपासून त्यांच्या संवैधानिक हक्कांपासून वंचित राहिला आहे. 'धनगड' नावाची जमात अस्तित्वात नसतानाही ही चूक नडली आहे.[ads id="ads2"] 

महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयात तीन वेळा स्पष्ट केले आहे की, 'धनगड' जमात अस्तित्वात नाही,मात्र 'धनगर'जमात अस्तित्वात आहे.त्यामुळे, धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता शासनाने त्वरित शासन निर्णय काढणे आवश्यक आहे.'धनगड' नावाची जमात १९५६ मध्ये आणि त्या आधीही महाराष्ट्रात अस्तित्वात नव्हती, परंतु 'धनगर' जमात अस्तित्वात होती आणि आहे. त्यामुळे 'धनगड' च्या जागी 'धनगर' जमातीला अनुसूचित जमात म्हणून मान्यता देणे संविधानाच्या कलम ३४२ ( १ ) नुसार आवश्यक आहे.पंढरपूर आणि लातूर येथे मागील १२ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे.उपोषणकर्त्यांची तब्येत अत्यंत चिंताजनक असून महाराष्ट्रातील धनगर जमात बांधवांच्या भावना तीव्र आहेत.

पंढरपूर येथील आंदोलना दरम्यान तीन व्यक्तींनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. १५ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत,मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी शासन निर्णय काढण्याचे आश्वासन दिले होते.

आत्तापर्यंत अनेक सरकारांनी धनगर जमातीची केवळ समित्या, अहवाल आणि अभ्यास करून बऱ्याच वेळा दिशाभूल केली. 

असल्याने जमातीमध्ये अजूनही सरकार केवळ देखावा अथवा वेळ काढूपणा तर करत नाही ना अशा भावना येऊ लागल्या आहेत.तरी महाराष्ट्र शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करून शासन निर्णय जारी करावा असे शासनाकडे पत्राद्वारे कळवावे.धनगर जमातीच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने आवश्यक निर्णय घेऊन न्याय देण्याची कृपा करावी.असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

    निवेदनावर रमेश धनंजय पाचपोळे,रवींद्र वसंत कुवर यांच्यासह एकूण २९ समस्त धनगर बांधवांनी स्वाक्षरी केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!