श्वानानी घेतला ३ जणांना चावा : यावल शहरात कुत्र्यांचा हैदोस, नगरपालिकेचे दुर्लक्ष

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील ) यावल शहरात जुन्या भुसावळ नाक्याजवळ माजी नगराध्यक्ष शिर्के यांच्या घराजवळ बीएसएनएल कार्यालयासमोर मोकाट श्वानांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन जणांना चावा घेतला यामुळे संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली आहे.[ads id="ads1"] 

       याबाबत सविस्तर माहिती अशी की वरील भागातील प्रशांत मनोहर बर्गे वय ४२, माऊ मयूर कानडे वय ६ ,राजू बळवंत देशमुख वय ४८ या तीन जणांना त्या भागातील मोखाट श्वानांनी कडक चावा घेतला त्यांनी तात्काळ औषधोपचार सुरू केला आहे. यावल शहरात ठीक ठिकाणी मोकाट श्वान आले कुठून ..? मोकाट श्वान हे मोटर सायकल चालकांच्या मागे सुसाट वेगाने धावून चावा घेण्याचा प्रयत्न करीत आहे.[ads id="ads2"] 

  शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या मागे श्वान धावत असल्याने  पालक विद्यार्थी व इतर नागरिकांमध्ये मोठे गबराट निर्माण झाली आहे याकडे यावल नगरपालिकेची दुर्लक्ष होत असले तरी यावल नगरपालिकेने तात्काळ कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!