रावेर (राहुल डी गाढे) : संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगुल वाजला असून वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महराष्ट्रात प्रचारात मुसंडी मारताना दिसून येत आहे.संपूर्ण महाराष्ट्रात गल्लो गल्ली,वाड्या,पाड्यात ,शेतकरी,मजूर,विद्यार्थी वर्ग यांच्याशी लोकसंवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम वंचित बहुजन आघाडी करत आहे.[ads id="ads1"]
त्याच पार्श्वभमीवर रावेर यावल विधानसभा चे शमिभा पाटील या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार असून त्यांच्या प्रचारार्थ बहुजनांचे युवा नेतृत्व सुजातदादा आंबेडकर हे रावेर विधानसभा दौऱ्यावर दिनांक 20 ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून तेथून पुढे ते मतदारसंघातील गावा गावात लोकांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेत फैजपूर येथे संध्याकाळी ठीक sc,st,obc, minority समुदायाच्या लोकांना ते मार्गदर्शन करणार आहे.