यावल तालुक्यात 3 ऑक्टोबर पासून ठीक ठिकाणी आरोग्य शिबिर :श्री स्वामी समर्थ गुरुपीठ भक्तगणांसाठी स्तूत्य उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील )

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरे यांचा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड. मेडिकल ट्रस्ट,श्री स्वामी समर्थ सेवा खंड दिंडोरी प्रणित शाखा यावल यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.३ ते १० ऑक्टोबर २०२४ या सप्ताहात दररोज ठीक ठिकाणी आरोग्य शिबिर निश्चित करण्यात आले आहे. [ads id="ads1"] 

यावल तालुक्यातील भक्तगणांसाठी विविध आरोग्य शिबीर व मोफत आरोग्य तपासणी नाडीदोष परीक्षण तसेच सर्व रोग निदान शिबिर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे यात रक्तदाब, मधुमेह,डायबिटीज सर्व प्रकारचे कॅन्सर,साध्याचे विकार,कावीळ ,

त्वचा विकार,वाद विकार,पोटाचे विकार,महिलांचे विकार,मुतखडा, मुळव्याध,लहान मुलांचे,विकार मनोविकारे इत्यादी विकारांचे रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे तालुक्यातील शिबिरांची रूपरेषा गुरुवार ३ ऑक्टोंबर २०२४ रोजी यावल येथे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र माधवनगर टेलीफोन ऑफिस जवळ, शुक्रवार दि. ४  रोजी राम मंदिर नायगाव येथे,[ads id="ads2"]  शनिवार दि.५ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चिंचोली, रविवार दि.६ रोजी विकास सोसायटी मेन चौक बस स्टॅन्ड डांभुर्णी, दि.७ रोजी सोमवार रोजी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भवानी माता मंदिर जवळ साकळी येथे, मंगळवार दि. ८ रोजी श्री दत्त मंदिर अट्रावल,दि.९ बुधवार रोजी फैजपूर, दि.१० आक्टोंबर गुरुवार रोजी न्हावी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचा भाविक, भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक सद्गुरु परमपूज्य मोरे यांचा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट त्यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!