नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता "ई-पंचनामाॲप" माध्यमातून जलद गतीने भरपाई मिळणार : तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


तालुक्यात प्रत्येक तलाठी यांचे यूजर आयडी तयार

यावल ( सुरेश पाटील )

नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आता "ई-पंचनामाॲप" माध्यमातून जलद गतीने पारदर्शक,वस्तुनिष्ठ भरपाई मिळणार असल्याची माहिती यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझिरकर यांनी दिली.[ads id="ads1"] 

MRSAC आणि महाराष्ट्र राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपिकांचे / जमिनीचे / जनावरांचे / घरांचे /गोठांचे झालेले नुकसानीचे जलद,पारदर्शक,आणि वस्तुनिष्ठ भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांसाठी खास शासनाने ई - पंचनामा हे अत्यंत उपयोगी 'ॲप' विकसित केले.यासंदर्भात नाशिक विभागात ५ सप्टेंबर २०२४ रोजी विभागीय कार्यालय नाशिक या ठिकाणी नाशिक विभागातील महसूल,ग्रामविकास,कृषीविभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.[ads id="ads2"] 

  त्यानंतर दि.२० सप्टेंबर २०२४ रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात  जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.त्याअनुषंगाने यावल  तहसील कार्यालयात सर्व तलाठी मंडळ अधिकारी,नैसर्गिक आपत्ती क्लर्क यांना प्रशिक्षण देण्यात आले आणि दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर तहसिलदार श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांनी जिह्यात सर्वप्रथम ई - पंचनामा या पोर्टलवर  तालुक्याचे युजर आयडी क्रिएट केला असून यामध्ये तालुक्यातील सर्व कार्यरत तलाठी यांचे युजर आयडी तयार करून घेतले आहे.या पुढे तालुक्यात नैसर्गिक आपत्ती च्या नुकसानीचे पंचनामे हे  'ई' -पंचनामा या ॲप वरच होणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!