सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल हस्तगत : रावेर येथील गुन्हे शोध पथकाची कारवाई

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर  (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : पाल रस्त्यावर सुरु असलेल्या नाकाबंदी ठिकाणी सराईत गुन्हेगारांकडून गावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत करत, आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत रावेर पोलिसांत (Raver Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]

पाल-खरगोन रस्त्यावर शेरीनाका येथे नाकाबंदी लावण्यात आली आहे. या रस्त्याने मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सराईत गुन्हेगार गावठी पिस्तुल घेवून येत असल्याची गुप्त महिती पोलिसांना मिळाल्यावरून गुन्हे शोध पथकाने केलेल्या वाहन तपासणीमध्ये रात्री ३.५० वा वडोदा (ता. यावल) येथील भरत गणेश सोनवणे या आरोपीला ताब्यात घेत झडती घेतली असता, त्याकडे १० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल मिळून आल्याने, रावेर पोलीस स्टेशनला (Raver Police Station) पोलीस कॉन्स्टेबल समाधान ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. [ads id="ads2"]

  सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोख नखाते, सहा. पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेकॉ संजय मेढे (चालक), पोकॉ समाधान ठाकुर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, पोकॉ. कार शेख यांच्या पथकाने कार्यवाही केली.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!