यावल पंचायत समितीच्या मनमानी कारभामुळे निळे निशाण संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरू

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


यावल  ( सुरेश पाटील ) यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात तालुक्यात अनेक अडीअडचणी सुख सुविधा,गैरप्रकार याबाबत लेखी निवेदन दिल्यावर सुद्धा पंचायत समितीचा मनमानी कारभार सुरू असल्याने निळे निशाण संघटने मार्फत आज गुरुवार दि.३ ऑक्टोंबर २०२४ पासून यावल पंचायत समिती कार्यालय समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.[ads id="ads1"] 

       यावल तालुक्यातील भालशिव ग्रा.प.अंतर्गत टेंभीकुरण या गांवात आजही फक्त अनुसुचित जाती / जमातीचे लोक राहत असुन त्यांना शासनाने कुठल्याही मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, तसेच त्या गांवाचे ग्रामसेवक दलितआदिवासींना  कुठल्याही प्रकारचे दाखले अथवा प्रस्ताव देत नाहीत तसेच यापूर्वी आमचे कडुन प्रत्येक वर्षाला तत्कालीन ग्रामसेवक आमचे कडून ग्रामपंचायत कर वसुल करीत होते परंतु  द्वेषभावनेने प्रेरित झालेल्या विद्यमान ग्रामसेवक जाणिव पुर्वक दलित आदिवासींना आपल्या मुलभुत हक्कापासुन वंचित ठेवले आहे,त्या संदर्भात गेल्या २ वर्षांपासून अनेक वेळेस आंदोलन करून लेखी स्वरूपात निवेदन दिले.[ads id="ads2"] 

   परंतु जाणिव पुर्वक टेंभीकुरण गांवातिल दलित आदिवासी समाजाच्या समस्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे,तसेच दहिगाव,सावखेडे येथील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकरणात झालेल्या अनियमितता व  गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी व दोषी व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.या मागणीकडे जाणीव पुर्वक यावल पंचायत समितीने दुर्लक्ष केले आहे. त्याआनुषंगाने निळे निशाण संघटनेच्या वतीने दि.०३ ऑक्टोबर २०२४ पासुन पंचायत समिती कार्यालय यावल येथे बेमुदत ठिय्या आंदोलनाची सूरुवात करण्यात आलेली आहे तरी आम्हाला २ दिवसात समाधानकारक उत्तर न मिळाल्यास दि. ५ ऑक्टोबर २०२४ पासून ठिय्या आंदोलनाचे रूपांतर  आमरण उपोषणात करण्यात येईल असा इशारा निळे निशाण संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष विलासभाऊ तायडे यांनी व पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी, महिला,पुरुषांनी दिला आहे. निळे निशान संघटनेच्या ठिय्या आंदोलनात अनेक महिला पुरुषांनी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलेला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, पोलीस अधीक्षक पोलिस अधीक्षक सो,

उपविभागिय अधिकारी,यावल

तहसिलदार,पोलिस निरीक्षक 

यावल यांना देण्यात आल्या आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!