ॲड. प्रकाश आंबेडकरांसाठी मिरजेतील कार्यकर्त्यांचे दर्ग्यात आणि मंदिरात साकडे

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


मिरज (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची प्रकृती खालवली असून त्यांना पुणे येथील पुना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांना काल रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आज पहाटे उपचारासाठी दाखल केले आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत लवकर बरी व्हावी म्हणूनमिरजेतील पदाधिकाऱ्यांनी खाजा शमना मिरासाहेब दर्ग्याला गलेफ अर्पण करत अंबाबाई देवी मंदिरात घातले साकडे घातले आहे.[ads id="ads1"]

ॲड. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी यासाठी आज मिरजेतील पदाधिकारी आणि सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यांच्या कडून मिरजेतील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हजरत खाजा शमना मिरासाहेब दर्ग्याला गलिफ अर्पण करून मिरजेतील ब्राह्मणपुरी येथील अंबाबाई मंदिर येथे देवी अंबाबाईला देखील त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करून देवीला साकडे घालण्यात आले.[ads id="ads2"]

यावेळी जिल्हाध्यक्ष‌ महावीर तात्या कांबळे हे भावूक झाले होते. लवकरात लवकर प्रकाश आंबेडकर यांची तब्येत ठीक होऊन पुन्हा त्यांचा झंझावत महाराष्ट्रात घोघावावा. यासाठी कार्यकर्त्यांनी आज गलेफ अर्पण करून साकडे घातले आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष महावीर तात्या कांबळे, मिरजेचे उमेदवार विज्ञान माने,सांगलीचे उमेदवार अल्लाउद्दीन‌ काझी,नितीन सोनवणे,सागर आठवले,ऋषिकेश‌ माने,अर्जुन‌ खोत,विशाल धेंडे,बाळासाहेब कोलप,सचिन कोलप,प्रमोद मल्लाडे,मानतेश‌ कांबळे,श्रवण नाटेकर आणि पदाधिकारी,कार्यकर्त उपस्थित होते.

बाळासाहेबांवर उद्या पुण्यात अँजिओप्लास्टी होणार 

बाळासाहेब आंबेडकर यांची आज अँजिओग्राफी झाली. उजव्या कोरोनरी धमणीमध्ये एक लहान ब्लॉकेज आढळला आहे, जो अँजिओप्लास्टीने सहजपणे काढला जाऊ शकतो. त्यांची प्रकृती स्थिर असून, वैद्यकीय तज्ज्ञांच्या टीमकडून योग्य ती काळजी घेतली जात असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीकडून देण्यात आली आहे.

ॲड. आंबेडकरांच्या प्रकृतीची माहिती देताना वंचित बहुजन आघाडीकडून असे सांगण्यात आले आहे की, दुपारच्या जेवणात बाळासाहेबांनी भाजी, डाळ, चपाती घेतली आहे. बाळासाहेबांवर उद्या पुण्यात अँजिओप्लास्टी होणार आहे.

बाळासाहेबांच्या अँजिओग्राफीचा अहवाल दिनांक  १नोव्हेंबर रोजी १० वाजता प्रसारमाध्यमांसमोर येणार आहे. 

आंबेडकर परिवाराच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा अशी आम्ही पुन्हा सर्वांना विनंती करत असल्याचेही वंचित ने सांगितले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!