महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर धनगर समाजाचा जाहीर पाठिंबा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे



रावेर प्रतिनिधी: रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांना धनगर समाजाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. समाजाच्या वतीने ना.गिरीशभाऊ महाजन यांना अधिकृत पत्र देऊन हा पाठिंबा घोषित करण्यात आला आहे.[ads id="ads1"]

महायुतीच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर, रावेर व यावल तालुक्यातील धनगर समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांनी अमोल जावळे यांच्या उमेदवारीला साथ दिली आहे.

यावेळी समाजातील विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी या पाठिंब्याला जोरकस समर्थन दिले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांमध्ये संदीप सावळे, हिलाल सोनवणे, लखन सावळे, राजन लासूरकर, राजू पाचपोळे, दिलीप धनके, निलेश सावळे, रमेश सावळे, ज्ञानेश्वर केळकर, प्रवीण पाचपोळे, हेमराज लासूरे, प्रवीण अजळसोंडे, पांढरी धनगर, किरण पाचपोळे, अशोक धनके यांचा समावेश होता.[ads id="ads2"]

या पाठिंब्यामुळे रावेर व यावल तालुक्यात महायुतीच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले आहे, तसेच धनगर समाजाच्या या समर्थनामुळे निवडणुकीतील समीकरणे महायुतीच्या बाजूने अधिक मजबूत होत आहेत.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!