रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : रावेर येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त रावेर माळी पंच मंडळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला. व या निमित्त महात्मा फुले यांच्या जीवनावर 8 विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे भाषणाचा कार्यक्रम घेण्यात आला यात प्रणील अनिल महाजन सृष्टी विनोद पाटील खुशी प्रवीण महाजन लक्ष्मी अमोल महाजन समाज बांधव कडून रोख बक्षीस मिळाले यात मुख्य वक्ता शिक्षिका योगिता महाजन यांचे मार्गदर्शन लाभलेह्या कार्यक्रमात समस्त माळी समाज पंच मंडळमंडळ व समाज बांधव यांच्या वतीने विशेष नैपुण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींची गौरव सत्कार बक्षीस देऊन करण्यात आला. [ads id="ads1"]
येथील माळी समाज मंगल कार्यालयात पंच मंडळाचे अध्यक्ष नितीन महाजन हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.माळी समाजातील १९० विद्यार्थी विद्यार्थिनींचा गौरव करून बक्षीस देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी समाजाचे पंच मंडळ विश्वस्त प्रल्हाद महाजन, अध्यक्ष नितीन महाजन, सचिव विनोद पाटील, सहसचिव तुषार मानकर पंच मंडळ सदस्य नामदेव महाजन, सुकलाल महाजन, पंडित महाजन,प्रल्हाद पाटील, प्रशांत पाटील, संतोष पाटील, संतोष महाजन,रविन्द्र महाजन, प्रकाश महाजन, नितीन मुरलीधर महाजन,माजी अध्यक्ष संजय महाजन, भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन,सुधाकर महाजन या सह समाजातील शिक्षक, शिक्षिका आणि समाज बांधव उपस्थित होते. [ads id="ads2"]
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य विश्वस्त प्रल्हाद महाजन यांनी केले. सूत्रसंचालन सचिव विनोद पाटील आणि प्रशांत पाटील यांनी केले..आभार प्रदर्शन विनोद पाटील ने मानले