महाराष्ट्र राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यात महायुतीने (Mahayuti) मोठ्या प्रमाणावर यश मिळाले त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये (EVM Machine) फेरफार केल्याचा दावा करत फेर मतमोजणीची मागणी केली आहे.[ads id="ads1"]
अनेक मतदारसंघामध्ये मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदारसंघामध्ये करण्यात आला आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांची ईव्हीएम मशीनची (EVM MACHINE) फेर मतमोजणी मागणी केली होती. ती मागणी मान्य झाली आहे. [ads id="ads2"]
सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती. बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना सूचना पत्र दिले आहे.
नाशिक पश्चिम विधानसभा(Nashik Pacchim Vidhansabha) मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत. तर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) दुसऱ्या स्थानावर आहेत. सीमा हिरे यांना 1 लाख 41हजार 725 मते मिळाली आहेत. तर सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांना 73 हजार 651 मते मिळाली आहेत. तर मनसेच्या उमेदवाराला 46 हजार 649 मते मिळाली आहेत.



