बाबूराव बोरोळे (विभागीय उपसंपादक लातूर)
लातूर : मागील पाच वर्षात विकासाची गंगा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहचवली असुन भविष्यातही उदगीर व जळकोटच्या विकासाची गंगा थांबु देणार नाही. मतदार संघात पर्यावरण पुरक योजना राबवणार असुन शहरातील मलनि:सारण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान कार्यक्रमांतर्गंत उदगीर शहर भुयारी गटार योजनेसाठी तब्बल ३५० कोटी रुपये मंजूर केले आहेत.या योजनेच्या पहिल्या टप्यातील १६२ कोटीच्या कामाला आज सुरुवात होत असुन सदर काम १८ महिन्यात पूर्ण होईल, जवळपास ९५ कि.मी. भुयारी गटारीचे काम पूर्ण होणार आहेत. शहरातील रोगराई कमी होवुन उदगीर शहर स्वच्छ, सुंदर होणार असल्याने व मागील पाच वर्षाच्या काळात आपण जो भौतिक विकास केल्याने महाराष्ट्रात विकासाचे शहर म्हणून आपल्या उदगीरची ओळख निर्माण झाली आहे. असे मत माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील बोधनगर येथील उदगीर शहर भुयारी गटार योजनेच्या भुमीपुजनप्रसंगी बोलत होते.[ads id="ads1"]
यावेळी माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी सभापती सिद्धेश्वर पाटील, समीर शेख, माजी नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उषा कांबळे, सुधीर भोसले, तहसीलदार राम बोरगावकर, न.प.चे अभियंता सुनिल कटके, जिल्हा नियोजन सदस्य प्रा.श्याम डावळे , भरत चामले, रा .काँ. चे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, ता.कार्याध्यक्ष वसंत पाटील, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, शहराध्यक्ष मनोज पुदाले, फैजुखाँ पठाण, धनाजी मुळे, शिवाजी भोळे, बाळासाहेब मरलापल्ले, नजीर हाशमी, अनिल मुदाळे, राजकुमार भालेराव, श्रीरंग कांबळे, मुकशे भालेराव,महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, अॅड.दिपाली औटे, मधुमती कनशेट्टे, काजल मिरजगावे, वैशाली कांबळे, उषा माने, उर्मिला वाघमारे, हुसना बानो, सुनिता तेलंगे, मंदाकिनी जीवने, आदी उपस्थित होते.[ads id="ads2"]
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी सांगितले की, शहरातील सांडपाणी व मलपाणी यामुळे होणा-या विविध रोगराई व दुर्गंधी पासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम हे म्हाडा, बोधननगर, इंडियानगर, निडेबन वेस, कपाळे गल्ली, रोकडे हनुमान, चौबारा, गांधीनगर, म.फुलेनगर, संजयनगर, नांदेड नाका, उदय काॅलनी, म.बस्वेश्वर चौक, शहर पोलीस ठाणे, चर्च रोड, आदी भागातुन होणार आहे.
दुस-या टप्प्यातील कामाला ही लवकरच सुरुवात करणार आहोत. मागील काळात पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवला असुन येत्या काळात उदगीर व जळकोटच्या विकासाची गंगा थांबु देणार नाही, असे आ.बनसोडे यांनी सांगितले. मतदार संघातील जनतेचे प्रेम हीच माझी ताकत असुन तब्बल ९३ हजार मतांनी मला मोठे मताधिक्य दिल्याने जनतेचे आभार मानले.
भुमीगत गटार योजनेची माहिती प्रकल्प प्रमुख ऋषीकेश बंडगर यांनी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक अनिल मुदाळे यांनी केले तर आभार नवनाथ गायकवाड यांनी मानले.
यावेळी बोधन नगर, म्हडा काॅलनीसह उदगीर शहरातील नागरीक व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



