भारतातील प्रथम क्रमांकाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॅट 2024 या स्पर्धेत रावेरातील कुष्णा राजेंद्र चौधरीने पटकावले प्रथम स्थान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी. जी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रावेर येथील माजी विद्यार्थी व प्रसिद्ध उद्योजक श्री राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांचे चिरंजीव कृष्णा राजेंद्र चौधरी यांनी ट्रिपल आय. आय. टी. नागपूर येथून आपले बी. टेक पूर्ण केले आणि एम.बी.ए. साठी भारतातील प्रथम क्रमांकाचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे कॅट 2024 या स्पर्धा परीक्षेत 99.5% मिळवत देशभरातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांमध्ये टॉप 1000 मध्ये स्थान मिळविले आहे.[ads id="ads1"]

  त्याचबरोबर कृष्णा राजेंद्र चौधरी यांनी इंग्रजी विषयात नेत्रदीपक कामगिरी करत देशातील टॉप 100 विद्यार्थ्यांमध्ये नंबर मिळविला आहे. ही रावेर व रावेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्त सरदार जी. जी. हायस्कूल व जुनियर कॉलेज रावेर येथे पुष्पगुच्छ देऊन उपप्रचार्य प्रा शैलेश राणे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की शालेय जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपण सहभाग नोंदविला पाहिजे. प्रश्नपत्रिकेचा सतत सराव करून परीक्षेची भीती दूर होत असते. [ads id="ads2"]

 आपण ग्रामीण भागातील आहोत असा न्यूनगंड न बाळगता पुस्तकांशी मैत्री करत सतत वाचन ,मनन ,चिंतन व लेखन करून परीक्षेत सहज यश मिळत असते. youtube वरील अभ्यासाने फक्त ऐकणे होते. प्रॅक्टिकली त्याचे उपयोजन होत नाही. त्याकरता पुस्तक वाचन महत्त्वाचे आहे अशा महत्त्वाच्या टिप्स विद्यार्थ्यांना दिल्या याप्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ प्रा श्री. बी. आर. महाजन,प्रा श्री. बी. एल. सरोदे, प्रा सौ. के. ए. नाईक,प्रा सौ. आर. बी. सरोदे, प्रा श्री. जे. के. पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा श्री. आर. आर. उपाध्ये यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा श्री. बी. एल. सरोदे यांनी केले संस्थेचे अध्यक्ष प्रा श्री. प्रकाश मुजुमदार , उपाध्यक्ष श्री. अशोक शेठ वाणी, चेअरमन डॉ श्री. दत्तप्रसाद दलाल, मुख्याध्यापक श्री. आर. आर. पाटील सर उपमुख्याध्यापक एन. जे. पाटील सर , संस्थेचे सहसचिव व सरदारजी जी हायस्कूल पर्यवेक्षक श्री. वाय. जी. कट्यारमल सर यांनी अभिनंदन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!