ऐनपूर येथिल सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर दत्तक वस्ती जि. प. शाळा बलवाडी येथे सुरू आहे. शिबिरार्थ्यांना पी. ओ. नहाटा कॉलेज, भुसावळ येथील डॉ. आर. एल. नाडेकर यांनी सहजयोग ध्यान या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सहज योग ध्यानाद्वारे शारीरिक व मानसिक संतुलन प्राप्त होऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. ध्यान कसे करावे ? ध्यान कुठे करावे? ध्यान किती वेळ करावे ? ध्यान करताना नेमके काय करावे? ध्यानात काय साध्य होते हे स्पष्ट केले. सहज योग ध्यानाद्वारे वर्तमानात राहण्याची सहज सोपी पद्धत आत्मसात करता येते.(ads)
सहजयोग ध्यानातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो व निर्णय क्षमता वाढते. कशाप्रकारे अनुभूती आली म्हणजे ध्यान झाले. कुठल्या प्रकारच्या ध्यानाने फायदा होतो. याबाबत सविस्तर मार्गदर्शन सहजयोग ध्यानातून डॉ. नाडेकर यांनी केले. सहजयोग ध्यानाच्या संस्थापिका परम पूज्य श्री. माताजी निर्मला देवी आहेत. त्यांनी 5 मे 1970 रोजी सहज योग ध्यानाची स्थापना करून अवघ्या विश्वात या ध्यानाचा प्रसार केला. हे ध्यान सर्व विश्वात विविध देशांमध्ये केले जाते. या ध्यानातून अनेक साधकांनी आपला सर्वांगीण विकास साध्य केला आहे. सदर सहजयोग ध्यान धर्मनिरपेक्ष असून सर्व समावेशक आहे. यातून व्यक्तीचा अंतर - बाह्य विकास होऊन व्यक्तीची निर्णय क्षमता वाढते. संतुलित जीवन प्राप्त होऊन शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सदृढ होते. (ads)
श्री. माताजींच्या मते “मेडिटेशन म्हणजे निर्विचारिता प्राप्त करणे होय.” सदर ध्यान सहज योग सेंटरला येऊन सामूहिकतेत केल्याने त्याचे प्रचंड फायदे झाले आहे. असा विश्वातील विविध सहज योगी बंधू-भगिनींचा अनुभव आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. डी. बी. पाटील, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सौ. रेखा पाटील, गोपाळ महाजन व श्रेयस पाटील उपस्थित होते.