सावदा ता.रावेर प्रतिनिधी (युसूफ शाह)
सावदाः- येथील ख्वाजा नगर मधील एका पत्री शेडच्या गोडाऊनमध्ये ६ गाई निर्दयीपणे बांधून ठेवल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१)(च)महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads1"]
याबाबत अधिक माहिती अशी की,शहरातील ख्वाजा नगर परिसरातील शेख रसुल शेख चांद कुरेशी यांच्या पत्री गोडाऊन मध्ये दि.३ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता गुप्त माहिती वरून सपोनि विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आला असता
यात १ लाख ३५ हजार किमतीच्या ६ गाई दोरीने गळा व पाय निर्दयीतेने बांधलेल्या अवस्थेत त्यांना हालचाल करणे शक्य होणार नाही अशा स्थितीत मिळून आले.तरी याबाबत शेख रसुल शेख चांद कुरेशी,वय ४०,शेख,जग्गा शेख पिरु कुरेशी,शाहबाज जमील कुरेशी,साहील जमील कुरेशी सर्व रा.ख्वाजानगर सावदा ता.रावेर या चौघे आरोपींविरुद्ध सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.[ads id="ads2"]
*चौघे आरोपी यांचे आडनातच सर्व काही दळलेले आहे?*
सावदा येथील ख्वाजानगर परिसरात पोलिसांनी दिलेल्या फिर्यादनुसार त्या पत्री शेड मध्ये ६ गाई ज्या निर्दयीपणे व क्रुतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या,तरी अशा निर्दयी अवस्थेत कोणीच पशुपालक शेतकरी व व्यवसायिक गाईला तरी अजिबात बांधून ठेवत नसून,सदरील सर्व आरोपी हे काय व्यवसाय करतात?सदरील गाई अशा अवस्थेत त्यांच्याकडे का आढळून आले?यावरूनच त्यांच्या व्यवसायाचा उद्देश चांगला की वाईट हे स्पष्ट होत असून,तरी या चौघे आरोपींविरुद्ध पोलिसांनी दाखल केलेला सदरील गुन्हा पुरेसा नसून,तरी याबाबत शहर व परिसरातील नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.तरी गोवंश तस्करीच्या संशयावरून सावदा शहरात याधी गालबोट लागलेले होते त्यामुळे दंगलीचा गुन्हा घडलेला होता.अशा गोवंश तस्करी मुळे गावाची शांततेला धोका निर्माण होऊ सर्व समाज त्या परिस्थितीत वेठीस धरला जातो.तरी सदर चौघे आरोपी विरुद्ध दाखल गुन्हा व त्यांची व्यावसायिक पार्श्वभूमी तपासून दखलपात्र दाखल झाल्यास अशा गोष्टींना आळा बसून कायद्याचं वचक बसेल,सबब यासाठी थेट याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.