यावल (सुरेश पाटील) : यावल शहर भाजपा महिला शहराध्यक्ष नंदाताई राजेंद्र महाजन व भाजपा शहर सरचिटणीस योगेश चौधरी यांच्यातर्फे यावल येथील तारकेश्वर विद्या मंदिरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाली या शिबिरात स्त्री पुरुष नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी करून घेतली.[ads id="ads1"]
सनएज आयुर्वेदिक कंपनी यांच्या माध्यमातून भाजपा महीला शहराध्यक्ष नंदाताई महाजन व शहर सरचिटणीस योगेश चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले... डॉ.एस.एन. महाजन,योगेश पवार,लतिका चौधरी,किरण बोलके यांनी नोंदणी व उपस्थित स्री - पुरुष नागरिकांची आरोग्यतपासणी केली.[ads id="ads2"]
यावेळीभाजप तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,भाजपा ओबीसी सेल प्रमुख हेमराज उर्फ बाळू फेगडे,भाजपा महिला अध्यक्षा नंदाताई महाजन भाजपा शहर सरचिटणीस योगेश चौधरी तसेच भाजप युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष रितेश बारी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.