रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 68 वा महापरिनिर्वाण दिना निमित्त सर्व प्रथम उपस्थित बौद्ध समाज बांधवानी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण, धुप, पूजा करण्यात आली यानंतर सामूहिक रित्या त्रिशरण पंचशील घेण्यात आले.[ads id="ads1"]
या वेळी आयु. नरेंद्र वानखेड़े यांनी मनोगत व्यक्त केले यानंतर ग्रा. पं. सदस्य साहेबराव वानखेड़े यांनी मनोगत व्यक्त करतांना असे म्हटले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वत आचरणात आणून आपल्या अंगी असलेले दुर्गुणाचा त्याग करुण अंधश्र्द्धा, व्यसन, मुक्त होण्याचा या महापरिनिर्वाण दिनी संकल्प करावा अशा आशयाचे मार्गदर्शन केले.[ads id="ads2"]
या प्रसंगी सांगवे गावातील माजी सरपंच नंदा तायड़े, सुरेश तायड़े, मनोहर तायड़े, करण तायड़े, लीलाबाई भालेराव, रोशनी तायड़े, मंगला तायड़े, प्रेम तायड़े, कार्तिक तायड़े, विनायक तायड़े, राहुल तायड़े करण तायड़े व गावातील बौद्ध उपासक, उपासिका, तरुण विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन अभिवादन केले.


