विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली ; उपदेश फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


उपदेश फाउंडेशन भुसावळ या सामाजिक संस्थेमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी ता. भुसावळ येथील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची मोठी राजा पाटी, सचित्र बालमित्र उजळणी पुस्तक, पट्टी, खोडरबर, पेन्सिल, पेन, २०० पेजेस एकेरी वही, दुरेघी वही, चौरेघी वही,चौकटी वही, विद्यार्थ्यांना प्राणी, पक्षी यांचे आकार तयार करण्यासाठी चिकण मातीचे बॉक्स, रंग खडू, आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक बिस्किट पुडा वाटप करून महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.[ads id="ads1"]

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त रेल्वे अकाउंट ऑफिसर, बी. व्ही. गायकवाड उपस्थित होते. त्याचप्रमाणे उपदेश फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष संदेश शिंदे, एम एस ई बी अधिकारी शेंदुर्णी यशराज हंबर्डीकर, खानदेश न्यूज चॅनेल चे किरण बोलके, रेल्वे पोलीस संघपाल सावंग, डीआरएम यांचे स्वीय सहाय्यक एम. एम .नायर, बँक मॅनेजर,मलकापूर अर्बन अजय इंगळे, बांधकाम व्यावसायिक दीपक पाटील,अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आणि जादूगार श्यामकुमार वासनिक, शिंदी येथील एम एस ई बी कर्मचारी ज्योती शिंपी, प्रदीप सपकाळे, रेल्वे कॉन्ट्रॅक्टर विक्रम सुकदाने, एडवोकेट आनंद जंजाळे, सेवानिवृत्त शिक्षिका सुवर्णलता तायडे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव हिवराळे, संदीप सपकाळे हे सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक भगवान बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षिका मीनाक्षी पाटील, प्रीती फेगडे, देवका परदेशी, रीना पाटील यांनी परिश्रम घेतले.[ads id="ads2"]

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष उपदेश फाउंडेशन संदेश शिंदे यांनी केले. त्यांनी उपदेश फाउंडेशनचे उद्देश झाडे लावा, झाडे जगवा. पाणी वाचवा, मुली वाचवा, मुली शिकवा. प्रदूषण टाळा, आरोग्य निरोगी ठेवा. आपला परिसर स्वच्छ ठेवा. व्यसन टाळा आणि निरोगी रहा असे उद्देश सांगितले. 

उपदेश फाउंडेशन अध्यक्ष यांनी वर्षभरामध्ये विविध दानदात्यांच्या माध्यमातून फक्त जिल्हा परिषद शाळेमधील गरजू, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले जाते असे त्यांनी मनोगतामध्ये सांगितले. त्याचप्रमाणे एडवोकेट आनंद जंजाळे यांनी बाबासाहेबांसारखे उच्च शिक्षण घेऊन आपल्या समाजाचा विकास करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. व्ही. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या आणि त्यांच्याप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन आपण भारताचे सुजाण नागरिक व्हावे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या उपक्रमाबद्दल गावातील ग्रामस्थ आणि पालक यांनी उपदेश फाउंडेशनचे खूप खूप कौतुक केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!