जिनीयस किड्स अ प्री स्कुल व आदित्य इंग्लिश मेडीयम स्कुल, रावेर येथे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

जिनीयस किड्स अ प्री स्कुल व आदित्य इंग्लिश मेडीयम स्कुल, रावेर येथे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : जिनीयस किड्स अ प्री स्कुल व आदित्य इंग्लिश मेडीयम स्कुल, रावेर येथे राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सविता झटकार मॅडम यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 रोज व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते असा संदेश मुख्याध्यापिका सौ.सविता झटकार मॅडम यांनी विद्यार्थांना दिला.विद्यार्थ्यांनी व्यायामाचे महत्त्व समजून घेतले.राष्ट्रीय युवा दिना निमित्त आयोजीत केलेल्या *सामुहीक सुर्य नमस्कार* कार्यक्रमात शाळेच्या इ. नर्सरी ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला. 

 तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शितल काळे मॅडम यांनी तर आभार सौ. पुनम चौबे मॅडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!