ऐनपूर महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 वर विद्यार्थी -शिक्षक संवाद कार्यशाळा संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ऐनपूर महाविद्यालयात स्कूल कनेक्ट 2.0 अंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 वर विद्यार्थी -शिक्षक संवाद कार्यशाळा संपन्न

      महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या निर्देशनानुसार ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर मार्फत परिसरातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 च्या प्रचार व प्रसारासाठी स्कूल कनेक्ट 2.0 अभियानाला 1 जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली आहे. 

(ads)

   राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 चा विद्यार्थ्यांना प्रचार व प्रसार व्हावा यासाठी परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जाऊन महाविद्यालयातील प्राध्यापकांनी नवीन शैक्षणिक धोरणा विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. त्या अनुषंगाने ११ /०१/२०२५ रोजी महाविद्यालयात इ.९ वी ते १२वी त शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षक यांच्यासाठी विद्यार्थी- शिक्षक संवाद कार्यशाळा व महाविद्यालयीन क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले . 

(ads)

  सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी अंजने हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- 2020 च्या अंतर्गत झालेल्या शैक्षणिक बदलांविषयी माहिती तसेच महत्व व उद्दिष्टेही सांगितली.कार्यशाळेचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 चे महाविद्यालयीन समन्वयक प्रा.डॉ. एस.ए.पाटील हे लाभले होते. डॉ. एस. ए. पाटील यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -2020 ची पार्श्वभूमी स्पष्ट करून ध्येय व प्रमुख उद्दिष्टे सांगितलीत. तसेच शालेय स्तरावर व महाविद्यालयीन स्तरावर झालेला बदल अधोरेखित केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात पारंपारिक व आधुनिक शिक्षण पद्धती याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. या धोरणात कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम रचनेवर व रोजगाराभिमुख शिक्षण वर भर देण्यात आला आहे. विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच त्याला रोजगाराच्या संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध होतील त्यासाठी आंतरवासिता, ऑन जॉब ट्रेनिंग यांची सुविधा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रामुख्याने करण्यावर भर दिलेला आहे असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिक्षक व विद्यार्थी यांनी विचारलेल्या प्रश्नांवर समर्पक चर्चा करून त्यांनी उत्तरे दिलीत.त्यानंतर आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सोयी सुविधा याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र ,संगणकशास्त्र या विषयांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय तसेच कार्यालय यांना भेट देऊन माहिती देण्यात आली. कार्यशाळेत परिसरातील वाघोदा, खिर्डी, पुरी गोलवाडे व निंबोल येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १३८ विद्यार्थी ,शिक्षक, महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. एच .एम .बाविस्कर यांनी तर आभार प्रा. एस .बी.महाजन यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!