बलवाडी ता.रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) - येथे सरदार वल्लभभाई पटेल कला आणि विज्ञान महाविद्यालय ऐनपुर यांचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सुरू आहे. या शिबिरात वैचारिक सत्रांमध्ये व्याख्यान देताना रावेर येथील नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक सी.पी. गाढे यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. वेगवेगळ्या आपत्ती आल्यानंतर कशा प्रकारचे वर्तन करावे. याबद्दलचे मार्गदर्शन प्राध्यापक गाढे यांनी केले.[ads id="ads1"]
भूकंप , सुनामी,विषबाधा,ज्वालामुखी यासारख्या अपत्ती वेळी योग्य नियोजन केल्यास कमीत जीवित आणि वित्त हानी होते. आजच्या काळामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण प्रत्येक युवकाला दिल्यास समाजाचे कमीत कमी नुकसान होऊ शकते. भविष्यातील राष्ट्र उभारणीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले युवक महत्त्वाची भूमिका बजावतील. असे मत प्राध्यापक सी.पी. गाढे यांनी मांडली.[ads id="ads2"]
यावेळी विचार मंचावरती प्राध्यापिका डॉक्टर रेखा पाटील,कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर डी बी पाटील हे उपस्थित होते.राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कुमकुम महाजन हिने केले.



