ऐनपूर : महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग व सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे बी अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले असून याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात ज्ञान स्त्रोत केंद्र मार्फत "वाचन कौशल्य कार्यशाळा" चे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .एस एन वैष्णव यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.[ads id="ads1"]
उद्घाटन प्रसंगी ग्रंथालयाचे प्रमुख डॉ. एस. एस. साळुंके यांनी आपल्या प्रास्ताविकेत वाचन कौशल्य कार्यशाळेचा उद्देश्य तसेच वाचन संस्कृती याबद्दल प्रास्ताविकात माहिती दिली, तसेच वाचन संस्कृती बद्दल विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ग्रंथालयात उपलब्ध विविध दुर्मिळ ग्रंथ, अवांतर वाचनाची पुस्तके तसेच नवीन दाखल झालेली पुस्तके यांची माहिती दिली. सदर कार्यशाळेसाठी वक्ते म्हणून वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. डॉ . एस. ए.पाटील हे होते, आपल्या संबोधनात त्यांनी वाचन संस्कृती बद्दल त्यांनी वाचकांना प्रेरित केले तसेच विविध दाखले देवून वाचनाची महती विषद केली. यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव यांनी आपल्या अधक्षिय भाषणात महाविद्यालयातील वाचकांनी जास्तीत जास्त ग्रंथालयाचा उपयोग करावा. सदर कार्यशाळेसाठी एकूण ४६ विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.[ads id="ads2"]
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जे.बी. अंजने यांच्या मार्गदर्शनात ग्रथंपाल डॉ.एस.एस. साळंके, आय.क्यू.ए.सी. समन्वयक तसेच उपप्राचार्य डॉ. एस. एन. वैष्णव, डॉ.पी.आर. महाजन, डॉ. एस. बी. पाटील, डॉ.एस.ए. पाटील, प्रा. हेमंत बाविस्कर, डॉ. जयंत नेहेते, प्रा. एस. आर. इंगळे, प्रा. एस. बी. महाजन, डॉ. व्ही.एन. रामटेके, प्रा. पी. एन. तायडे, प्रा. अक्षय महाजन, प्रा. नरेंद्र मुळे, प्रा. ज्ञानेश्वर कोळी,प्रा. संकेत चौधरी, श्री महेंद्र महाजन श्री हर्षल पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.



