ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
ऐनपूर येथील ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सौ दिपाली अतुल पाटील यानी पदभार स्विकारला आहे. सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथिल सरपंच अमोल प्रभाकर महाजन हे आपल्या खाजगी कामा निमित्ताने दोन महिन्यांच्या रजेवर गेले असल्याने दि १५ जानेवारी २५ रोजी ग्रामपचायतीची विशेष सभा घेण्यात आली त्यात सरपंच अमोल महाजन हे सुट्टीवर जात असल्याचा ठराव संमत करून उपसरपंच सौ दिपाली अतुल पाटील याची प्रभारी सरपंच म्हणून निवड करण्यात आली यावेळी अमोल महाजन यांनी प्रभारी सरपंच दिपाली पाटील यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी सुनिल गोसावी कर्मचारी उपस्थितीत होते यावेळी सौ दिपाली पाटील याची प्रभारी सरपंच पदी निवड झाल्या बद्दल ऐनपुर येथील नागरिकांनी त्यांचं अभिनंदन केले