सावदा ता.रावेर प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे भोई वाड्यातील रहिवाशी विनायक मनोज पवार वय २१ वर्षिय रा. भोईवाडा,या तरूणाने दि.२५ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास राहते घरात एकटा असताना छताच्या हुकला दोरी बांधून गाळ फास घेऊन आत्महत्या करून स्वत:ची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
$ads={1}
तरी या घटने बाबत प्रथम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विनायक पवार हा पवार एक्वा नावाने सावदा फैजपूर मार्गावर थंड जल व्यवसाय करीत होता.विनायक मनोज पवार वय २१ रा.भोईवाडा,हा राहते घरात एकटा असुन त्याने घराच्या छताच्या हुकाला दोरीने फाशी घेवुन आत्महत्या केल्याने मयत झाले आहे.
यातील खबर देणार सुरेश पवार यांनी सावदा पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर होवुन खबर दिली की,दुपारी १.३० वाजेच्या सुमारास विनायक याने त्याच्या राहते घरी भोईवाडा येथे घराच्या हॉलच्या छताच्या हुकाला दोरीने फाशी घेतल्याने तो मयत झाला आहे. याबाबात सुरेश पवार यांनी खबर दिल्याने बीएनएनएस १९४ प्रमाणे सावदा पोलिसात नोंद करण्यात आली असून शव विच्छेदना साठी त्याला रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील याचे मार्गदर्शना खाली व आदेशाने सहकारी पोलीस करीत आहे.


