भिम आर्मी व आजाद समाज पार्टी समाजकारण करताना सरंजामशाही व्यवस्थेला नाकारून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि सर्वसामान्य मतदारांना त्यांचे हक्क, अधिकार व मूलभूत सुविधा मिळाव्यात या उद्देशाने कार्यरत आहे. समाजकारणासोबत आता राजकारणातही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या दिशेने पुढाकार घेत, महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सहभागी होणार असल्याची घोषणा करण्यात आली.(ads)
जळगाव जिल्ह्यात निवडणूक लढवण्याचे सूतोवाच करण्यात आले असून स्वबळावर लढायचे की समविचारी पक्षांसोबत युती करून लढायचे याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
🔹 मराठा आरक्षणाबाबत भूमिका
संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मागणी होत असून शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुन्हा समाजाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. या लढ्यात “भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा युनिट” मराठा बांधवांसोबत ठामपणे उभी असून जिल्ह्यात कुठेही आंदोलन झाले तर आमचा सक्रीय पाठिंबा राहील, असे जाहीर करण्यात आले.(ads)
🔹 भुसावळ रेल्वे विभागातील मागणी
भुसावळ रेल्वे विभागात एससी-एसटी आरक्षण अंतर्गत रिक्त पदे पदोन्नतीद्वारे भरावीत, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. मात्र समानता मंचाचे पदाधिकारी चीफ लोको इन्स्पेक्टर अमित सक्सेना व व्ही.के. दुबे यांच्या विरोधामुळे ही पदे अद्याप रिक्त आहेत. याविरोधात त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला.(ads)
ही माहिती भिम आर्मी भारत एकता मिशन, जळगाव जिल्हा प्रमुख मा. गणेश भाऊ सपकाळे व जामनेर तालुका प्रमुख तथा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मा. प्रबुद्ध खरे यांनी भुसावळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
📍 या पत्रकार परिषदेस जिल्हा उपप्रमुख मा. मुदस्सर भाई खान, जिल्हा सचिव मा. वैशाली ताई पाटील, जिल्हा संघटक मा. संदीप भाऊ सपकाळे, भुसावळ तालुका प्रमुख मा. जावेद भाई शेख, तालुका उपप्रमुख मा. अल्केश भाऊ मोरे, तालुका संघटक मा. विशाल भाऊ वाघमारे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



