यावल ( सुरेश पाटील ) शहरात बुधवार दि.२७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री गणेश चतुर्थी निमित्त ठीक ठिकाणी श्री गणेशाची स्थापना होणार असल्याने काल शनिवार दि.२३ रोजी शहरातील गुरव वाड्यातील श्रीराम गणेश मित्र मंडळातर्फे बोरावल दरवाजापासून मेनरोडवरून गुरव वाड्यापर्यंत सुंदर आकर्षक असलेल्या लक्षवेधी अशा श्री गणेश मूर्तीची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून श्री गणेशाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
स्वागत मिरवणूक काढण्यासाठी श्रीराम गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन चौधरी,उपाध्यक्ष सागर धनगर व सर्व सदस्य तसेच गुरव वाड्यातील व परिसरातील तरुण मंडळींनी मिरवणुकीसाठी उत्कृष्ट असे नियोजन करून शांततेत श्री गणेश आगमनाची स्वागताची मिरवणूक काढली.


