यावल ( सुरेश पाटील )
शहरात दिवसेंदिवस अवैध विमल गुटख्याची खुलेआम,सर्रासपणे तस्करी वाढत आहे, यामुळे प्रामुख्याने शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे, गुटखा काणाऱ्यांचे मजूर वर्गाचे व इतर अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विमल गुटख्यासारख्या तंबाखूजन्य पदार्थांमुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांचे प्रमाण वाढल्याचे आरोग्य विभागाचे अहवाल दर्शवत असून अनेक गंभीर आजाराने त्रस्त आहेत. (ads)
दररोज सकाळी व रात्रीच्या सुमारास विमल गुटख्यांनी भरलेल्या मोठमोठी वाहने मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात येत आहे पूर्णाड फाटा मार्गे या गाड्या जळगाव,भुसावळ,यावल मलकापूर, अकोला,जामनेर,संभाजीनगर या भागांत पोहोचविल्या जात असल्याची चर्चा संपूर्ण मुक्ताईनगर तालुक्यात आहे. सर्रासपणे सुरू असलेल्या वाहतुकीकडे मुक्ताईनगर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सुद्धा सर्व स्तरातून केला जात आहे. (ads)
स्थानिक नागरिकांत, समाजात विशेष करून सुज्ञ महिला वर्गात या प्रकाराबाबत तीव्र संताप असून,
“पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे?” असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात असून याकडे लोकप्रतिनिधींचे सुद्धा दुर्लक्ष आहे का.? अशी चर्चा आहे. (ads)
अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?
अन्न व औषध विभाग झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून,यामध्ये काही अधिकारी, कर्मचारी गुटखा विक्रेत्यांशी समन्वय साधून असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.
शाळा कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ठिकठिकानच्या विक्रेत्यांकडून गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थी व तरुण पिढी या गुटखा व्यसनाच्या विळख्यात अडकले आहे.आरोग्य विभागाने वेळेत लक्ष न दिल्यास, भविष्यात कॅन्सरसारख्या आजार असलेल्या रुग्णांची संख्या वाढत जाणार असल्याची सामाजिक भीती व्यक्त केली जात आहे. (ads)
कारवाई होणार कधी?
स्थानिक प्रशासन आणि पोलीस खात्याने या अवैध तस्करीवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. अन्यथा ही तस्करी आणखी वाढेल आणि त्याचे परिणाम समाजावर व आरोग्यावर दीर्घकाळासाठी भोगावे लागतील एवढे मात्र निश्चित असल्याने लोकप्रतिनिधी आणि सुज्ञ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून बेधडक कारवाई करायला पाहिजे अशी अपेक्षा संपूर्ण मुक्ताईनगर सह भुसावळ परिसरातून व्यक्त करण्यात येत आहे.



