विशेष लेख : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

विशेष लेख : आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस

निरक्षरता महापाप समजावे 

8 सप्टेंबर: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस 

        _शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव लोकांना व्हावी आणि शिक्षणाबद्दल जागरुकता वाढावी, हा साक्षरता दिन साजरा करण्यामागचा हेतू आहे. शिक्षण घेतले तर कोणताही माणूस जीवनात यश मिळवू शकतो. कोणत्याही देशातील साक्षरतेचे प्रमाण किंवा साक्षरतेचा दर वाढला तर त्या देशाचाही झपाट्याने विकास होतो.साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ वाचन आणि लिहिण्यास सक्षम असणे असा होतो. जगातील सर्व देश त्यांच्या प्रत्येक वर्गातील नागरिकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साक्षरता दिवस साजरा करतात. भारतात सात वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती किमान एका भाषेत लिहू-वाचू-बोलू शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजतात. थोडक्यात साक्षरतेसाठी देशात अक्षर ओळख असण्याला महत्त्व आहे. पण साक्षरता म्हणजे एवढेच नाही तर साक्षरता म्हणजे आपल्या हक्कांविषयी आणि कर्तव्यांविषयी जाणीव असणे. सदर समाजप्रबोधक लेख श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजींनी प्रस्तुत केला आहे... संपादक._

(ads)

        आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. युनेस्को ने १९६६ मध्ये या दिवसाची स्थापना केली, ज्याचा उद्देश व्यक्ती, समुदाय आणि समाजासाठी साक्षरतेचे महत्त्व व त्यातून होणारे फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. हा दिवस आपल्याला अधिक साक्षर, न्याय्य आणि शांततापूर्ण समाज निर्माण करण्याच्या दिशेने धोरणे आखण्यासाठी आणि कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करतो. कोणत्याही देशाच्या विकासासाठी साक्षरता खूप महत्त्वाची आहे. देशातील नागरिक जेवढे साक्षर असतील, तेवढा देश प्रगती करू शकेल. साक्षरतेचे हे महत्त्व लोकांना जागृत करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. समाजात शिक्षणाचा प्रसार व्हावा या उद्देशाने साक्षरता दिवस जगभरात साजरा केला जातो. भारतातही जागतिक साक्षरता दिवस हा महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून भारत साक्षरतेच्या दिशेने कौतुकास्पद काम करत आहे. जागतिक साक्षरता दिवस कधी आणि का साजरा करण्यास सुरुवात झाली ते जाणून घेऊया? प्रथमच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कधी आणि कोणी साजरा केला? साक्षरता दिनाचा इतिहास काय आहे आणि या वर्षीची थीम काय आहे जाणून घ्या. 

  (ads)

   साक्षरता म्हणजे काय?: तर हा दिवस साजरा करण्यापूर्वी साक्षरता म्हणजे काय हे जाणून घेतले पाहिजे. साक्षरता हा शब्द साक्षर या शब्दापासून बनला आहे, ज्याचा अर्थ वाचन आणि लिहिण्यास सक्षम असणे असा होतो. जगातील सर्व देश त्यांच्या प्रत्येक वर्गातील नागरिकांपर्यंत शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साक्षरता दिवस साजरा करतात. साक्षरता दिवस दरवर्षी ८ सप्टेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. साक्षरता दिवस पहिल्यांदा सन १९६६मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 

  (ads)  

    साक्षरता दिनाचा इतिहास- युनेस्कोने दि.७ नोव्हेंबर १९६५ रोजी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ८ सप्टेंबर १९६६पासून दरवर्षी जागतिक साक्षरता दिवस साजरा केला जाऊ लागला. भारतातील साक्षरतेच्या दराबद्दल बोलायचे झाले तर ते जागतिक साक्षरतेच्या दरापेक्षा ८४ टक्के कमी आहे. सन २०११मध्ये भारताचा एकूण साक्षरता दर ७४.४% आहे, ज्यामध्ये पुरुष साक्षरता ८२.३७% आणि महिला साक्षरता ६५.७९% आहे. दोघांच्या साक्षरतेच्या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. केरळ हे देशातील सर्वाधिक साक्षर राज्य आहे आणि बिहार हे सर्वात कमी साक्षर राज्य आहे, हे विशेष!

!! सर्वांना आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या सप्ताहभर हार्दिक हार्दिक शुभेच्छा जी !!


                     - संकलन व सुलेखन -

                   श्री कृष्णकुमार आनंदी-गोविंदा निकोडे गुरुजी.

                   एकता चौक, पाॅवर हाऊसच्या मागे, रामनगर, गडचिरोली.

                  फक्त व्हॉट्सॲप-९४२३७१४८८३

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!